in

खामगाव- आलेगाव बसला अपघात

बुलढाणा | संदीप शुक्ला | जिल्ह्यातील खामगाव आगाराची एस.टी. बस पुलावरून घसरून वाहत्या नदीत पडल्याची घटना आज घडली आहे. मात्र पुलाची उंची कमी असल्याने चालक आणि वाहकासह बसमधील सर्वच्या सर्व १५ प्रवाशी सुरक्षित आहेत.

हा अपघात देऊळगाव साकर्शा-अकोला रस्त्यावरील उतावळी पुलावर घडला आहे. साकर्शा जवळील उतावळी पुलावरून पाणी वाहत असल्याने खड्ड्यामुळे बस पुलाखाली गेली आहे. मात्र पुलाची उंची केवळ ३ फूट असल्याने सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. नागरिकांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संतप्त गावकऱ्यांनी फाल्गुनी नदीत बसून केला प्रशासनाचा निषेध

CISFच्या 40 जवानांची सायकल रॅली साताऱ्यातून पुण्याकडे रवाना