in

पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदावरून किरण बेदींना हटवलं

पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदावरून किरण बेदी यांना हटवण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनाने दिली आहे. तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकारमधील ४ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार अस्थिर झालं. यानंतर बेदी यांना पदावरून हटवल्याची माहिती राष्ट्रपती भवनानं दिली आहे.

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी आणि किरण बेदी यांच्यातील संघर्ष जुना आहे. बेदी यांच्याविरोधात मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी अनेकदा आंदोलनही केली आहेत. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये ४ आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्यानं विधानसभेत काँग्रेस सरकारनं बहुमत गमावलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Weather Update : राज्यात पुन्हा गारपीटसह मुसळधार पावसाची शक्यता

Farmers Protest | शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत केला मोठा दावा, म्हणाले…