in

‘ठाकरेंनी भगवा सोडून हिरवा रंग धारण केलाय’

किरीट सोमय्या कोल्हापूरला निघाले असताना त्यांना कराडमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक केली जात आहे. मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तक्रारदाराला राखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम ठाकरे सरकारने केलं आहे. मला दिलीप वळसे पाटील यांना विचारायचे आहे की मला कोणत्या आदेशा अंर्तगत गणेश विसर्जन करण्यापासून रोखलं, मला माझ्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं, असे अनेक आरोप करत सोमय्या यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे.

‘ठाकरे सरकारची ठोकशाही बघा, CSMT मध्ये मला धक्काबुक्की केली, ट्रेन मिळू नये यासाठी मला स्टेशन बाहेर अडवलं. मी त्यांना विचारलं कोणत्या नियमा अंतर्गत अडवत आहेत त्यावर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे पत्र दाखवले. त्या ऑर्डर चॅलेंज केलं ते पळून गेले, ठाकरे सरकारचे पोलीस खोटी ऑर्डर दाखवतात, व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात, ठाकरे सरकारने हिरवा रंग धारण केला असेल, भगवा रंग सोडून दिला असेल. पण ते मला गणपती विसर्जनापासून रोखू शकत नाहीत, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही, याविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार. पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, बोगस ऑर्डर दाखवणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कराड स्थानकावर सोमय्या पोलिसांच्या ताब्यात; पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका

खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच; मुश्रीफांचा गंभीर आरोप