in

कोल्हापूरात नवजात अर्भकाला पोत्यात गुंडाळून फेकलं

सतेज औंधकर, कोल्हापूर | कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या शिंगणापूर इथं नवजात अर्भकाचा मृतदेह पोत्यात घालून पडसर शेतवडीत फेकल्याची दुदैवी घटना घडली आहे. पुरुष जातीचं हे अर्भक आहे. या शेतवडीत मुलं खेळत होती. नाल्याच्या बाजूला खेळणार्‍या मुलांना हे मृत अर्भक दृष्टीला पडल्यानं त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कोल्हापुर जिल्हा करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या गणेश नगरजवळ हरिजन समाजाची पडसर सामाईक शेती आहे. इथं काही प्रमाणात झुडप उगवलेली आहेत, तर रिकाम्या क्षेत्रात मुलं खेळतात. या ठिकाणी छोटासा पाण्याचा नाला आहे. या परिसरातील मुलं आज तिथं खेळत होती. दरम्यान एक मुलगा या नाल्याशेजारी गेला असता, प्लास्टिक गोणपाटामध्ये नवजात अर्भकाचा मृतदेह त्याला दिसला. त्या मुलानं आरडाओरडा करत, परिसरातील नागरिकांना त्यांची माहिती दिली. त्यानंतर सरपंच प्रकाश रोटे, दत्तात्रय आवळे घटनास्थळी आले.
हे अर्भक पुरुष जातीचं असून, त्याच्या पोटाचा आणि डोक्याचा काही भाग कुत्र्यानी ओरबाडल्यानं पाहणार्‍याच्या अंगावर काटा येत होता.करवीर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून, या अर्भकाच्या मृतदेहाचा पंचनामा करत, पुढील तपास सुरू केलाय. अनैतिक कृत्यातून हे नवजात अर्भक या परिसरात टाकून देण्यात आलं असावं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Omicron Corona | क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर; नव्या व्हेरियंटचा मुंबईच्या टेस्ट मॅचवर परिणाम होणार नाही

Winter Session | शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाईसह राज्यसभेचे 12 खासदार निलंबित