in

मराठा आरक्षण मुद्द्यावर कोल्हापूरात मराठा नेते आक्रमक

कोल्हापूरात मराठा समाजाच्या महत्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या आंदोलन इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली आहे. बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचे महत्त्वाचे नेते पदाधिकारी उपस्थित असून ,खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी बैठकीत चर्चा सुरू आहे.

मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई करणार असून येत्या 16 जूनला मूक मोर्चा नाही तर आक्रमक मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर येत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार जाणार आहे. राज्यभरातील मराठा समाजाचे नेते कोल्हापूरच्या मोर्चात सहभागी होणार आहेत . या विराट मोर्चा साठी कोल्हापूरकरांनी जय्यत तयारी सुरू झाली आहे. 10 जून रोजी पुन्हा महत्त्वपूर्ण बैठक शिवाजी मंदिर येथे संपन्न होणार अशी माहिती मराठा नेते दिलीप पाटील यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज..वनडे – टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर

अमरावती आढळलं अज्ञात प्रेत.. हत्या की आत्महत्या