in

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा महावितरण विरोधात एल्गार

ग्रामपंचायतीच्या वीज तोडणी विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात

सतेज औंधकर,कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पाणी योजना आणि पथदिव्यांची थकबाकीचे कारण पुढे करून महावितरणने ग्रामपंचायतीचे पथदिवे आणि पाणीपुरवठा खंडित करीत आहेत. या विरोधात जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी एकत्र येऊन महावितरणच्या विरोधात आंदोलन पुकारला आहे.

कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या दारात सोमवारी ग्रामपंचायतीच्या वीज तोडणी विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राजू मगदूम यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना एकत्रित करत महावितरणच्या विरोधात हे आमरण उपोषण सुरू केलं आहे.

ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार कर वसुलीचे अधिकार हे कायद्याने दिलेले आहेत आणि 129 नुसार वसुली करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. असे असताना जिल्ह्यातील वेगवेगळ्या उपविभागात अंतर्गत ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीज कनेक्शन बंद करण्याचे उद्योग सुरू आहेत. याउलट महावितरणची कर बाकी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना करोडो रुपये देणे बाकी आहे व राज्य शासनाने यापूर्वी ही एक शासन निर्णय काढला आहे. मात्र महावितरण मनमानी करत असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू केला आहे. उपोषणाची दखल न घेतल्यास महावितरणच्या जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात बैठक; थकित GSTवरुन सरकारला घेरण्याची रणनीती आखणार?

सोने- चांदीचे भाव वाढले, जाणून घ्या दर