लोकशाही न्यूज नेटवर्क
कोल्हापुरातील राजाराम तलावात साठ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. निर्घृण खून करून तिचा अर्धवट मृतदेह सापडल्याने शहरात एकाच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीसांनी घटनास्थळी पोहचले.
मृतदेहाच्या फक्त कमरेच्या खालचा भाग असल्याने त्यावरून खून झालेल्या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती वरून, राजाराम तलाव परिसरात जवळ मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना एका पिशवीत मृतदेहाचे काही अवशेष असल्याचे दिसले. याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पिशवीमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह मिळून आला. महिलेचा खून करून तिचा अर्धवट मृतदेह पाण्यात फेकल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठविला आहे. ही महिला ६० वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तिची ओळख पटवल्यानंतरच खूनाचा प्रकार उघडकीस येईल. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरू आहे.
मागील वर्षी 3 फेब्रुवारीला वर्ध्यातील हिंगणघाट जळीत प्रकरण घडले होते. प्राध्यापक असलेल्या या तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार झाला, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांच्या संखेत वाढ झाली असून गुन्हा करण्याची क्रूरता देखील वाढली आहे.
Comments
Loading…