in

वाळू उपसा प्रकरणी दंड न भरल्याने महसूलकडून जमीन जप्त

संगमनेर तालुक्यातील साकुर येथे मातीमिश्रीत वाळू उत्खनन परवानगीच्या नावाखाली मुळा नदी पात्रातून वाळू उपसा केल्याप्रकरणी दंडाची रक्कम न भरल्याने संगमेर महसुल विभागाकडुन चक्क आता जमीन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

काही शेतकरी बांधवानी तक्रार केल्यानंतर वाळू उपसाचे पुरावे सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी संगमनेर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी संगमनेर यांच्याकडे देऊन कारवाईची मागणी केली होती. अमोल खताळ यांनी परवानातील अटी व शर्तचा भंग केला म्हणून उत्खनन तात्काळ बंद करा अशी मागणी केली. याच मागणीवरून स्थानिक तलाठी व मंडल अधिकारी यांनी पंचनामा करत ४० लाखाच्या दंडात्मक आदेशाची नोटीस अजिज चौगुले यांना पाठवली. चौगुले यांनी पाठविलेल्या नोटीसीला केराची टोपली दाखवली होती. चौगुले हे दंड रक्कम भरत नसल्यामुळे त्यांची साकुर येथील गट नं. १२२/२ क्षेत्र ३५ आर पोट खराब १७ आर या ७/१२ उतारा असलेल्या जमीन जप्तीची कारवाई आखेर करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रभरातील वाळु तस्करांचे धाबे चांगलेच दनानले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आम्ही देशातंर्गत तेल प्रकल्प तरी उभारले, तुम्ही सात वर्षांत काय केले ते सांगा…

‘भक्त’ चंद्रकांत पाटील म्हणतात, कलाम राष्ट्रपती झाले ते…