in

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उध्वस्त

व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली | गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मोठा कॅम्प लावून घातपाताची मोठी योजना आखली होती. मात्र गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाने घटनास्थळी जात नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उध्वस्त केला. या विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याचे संकेत दिले.

गडचिरोली उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके कोठी हद्दीतील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील मौजा कोपर्शी व मौजा फुलनार जंगल परीसरात २६ ऑक्टोबर २०२१ रोजी नक्षलवाद्यांनी मोठा कॅम्प लावला असल्याच्या व घातपाताची मोठी योजना असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान रवाना करण्यात आले होते.

सदर परीसरामध्ये कॅम्प उध्वस्त करण्याकरीता गेले असता दुपारी ०४.३० ते ०७.०० वाजेच्या दरम्यान कंपनी- १० व भामरागड दलाच्या नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरा दाखल स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असता पहिल्यांदा चकमक घडून आली. त्यावेळी नक्षलवाद्यांनी पळ काढला. त्यानंतर जवानांनी पाठलाग केला असता, पुन्हा नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला तेव्हा दुसऱ्यांदा चकमक घडून आली. तिथुन नक्षल्यांनी पळ काढल्यानंतर जवानांनी पुन्हा नक्षलवाद्यांचा पाठलाग करीत असतांना तिसऱ्यांदा चकमक घडून आली. यावेळी नक्षलवाद्यांनी संधीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. जवानांनी न डगमगता त्याना प्रत्युत्तरादाखल सडेतोड उत्तर देत, नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले यात जवानांना नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उध्वस्त करण्यात मोठे यश मिळाले.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, मोठया प्रमाणावर व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. आयईडी हे अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असुन जवानांनी नक्षलविरोधात महत्वपुर्ण कारवाई करत नक्षलवाद्यांची घातपाताची मोठी योजना उधळुन लावण्यात यश मिळविले आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे, पोलीस उपअधिक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले, सी-६० प्राणहिताचे प्रभारी अधिकारी योगीराज जाधव यांनी सदर नक्षल विरोधी अभियान यशस्वी करण्यासाठी अथक परीश्रम घेतले.’विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याचे संकेत दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BJP-MNS Alliance | अखेर ‘या’ जिल्ह्यात झालीच भाजप-मनसेत युती

पालघरमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात