लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईत मालाडच्या दानापाणीमध्ये वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याच अखत्यारित हा भाग येतो.
मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींबरोबर शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. त्यातही आदित्य ठाकरे आघाडीवर होते. तर आता दानापाणीत वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला असून या जागेवर एमटीडीसीचा बोर्ड लावण्यात आला आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन ही दोन्ही खाती आहेत, हे उल्लेखनीय!
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा हा मतदारसंघ असून त्यांच्या मतदारसंघात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. भाजपा नगरसेवक विनोद मिश्रा यांनी या संदर्भात 3 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेकडे तक्रार केली आहे. तरीही त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली ऩाही. एक हजारांपेक्षा झाडांची आणि तिवरांची कत्तल केल्याचा आरोप विनोद मिश्रा यांनी केला आहे.
Comments
Loading…