in ,

जाणून घ्या भोगी आणि संक्रातीचे महत्व

नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रात. दरवर्षी १४ जानेवारीला देशभरात मकर संक्रात विविध प्रकारे साजरी केली जाते. हा सण तीन दिवस सलग साजरा केला जातो. नेमका हा सण कसा साजरा केला जातो ? या सणाचे महत्व काय ते जाणून घेऊयात…

संक्रातीच्या पहिल्या दिवसी भोगी हा साजरा केला जातो. या दिवसी भोगीची विशिष्ठ भाजी केली जाते. गाजर, मटार , वांगी, घेवडा, अशी एकत्र चवीष़्ट भाजी बनवली जाते. थंडीच्या दिवसात उष्ण व सिंग्ध पदार्थ खाल्ले जावे, या करीता ही भाजी केली जाते. त्याच बरोबर बाजरी आणि तीळाची भाकरी केली जाते. हे सगळे पदार्थ शरीराला उष्णता निर्माण करण्याचे काम करते.

भोगी नंतर संक्रातीला विशेष महत्त्व दिले जाते. बड्या उत्साहाने हा सण देशभरात साजरा केला जातो. या दिवशी तीळाचे लाडू खाल्ले जातात. ग्रामीण भागात शेतात पिकवलेले धान्य उस, हरभरा, बोर, शेंगा , गाजर, मटार, हे सुगडीत ठेवून देवाला नैवेेद्य दाखवला जातो. सुगडी म्हणजे मातीची मडकी. या दिवसी हळदी- कुंकूचा कार्यक्रम केला जातो, संक्रातीला काळ्या रंगाची साड्या नेसल्या जातात. याचे ही विशेष महत्त्व आहे, काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि शरिराला ऊब देतो,

संक्रातीला मोठ्या उत्साहाने पंतग उडवले जाते. शरिराची हालचाल होते, आणि शरीराला उन्हातून व्हिटामीन डी मिळते.संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत सण साजरा केला जातो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मायदेशी खेळवला जाणार का IPL चा १५ वा हंगाम?

वर्ध्यात मनसेला धक्का; प्रदेश उपाध्यक्षासह 28 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश