in

डाव्या चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते कॉ.सुभाष काकुस्तेंना जीवे मारण्याची धमकी

उमाकांत अहिरराव, धुळे | धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातील डाव्या चळवळीचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते कॉ.सुभाष काकुस्ते यांना दोन अज्ञात व्यक्तींनी साक्री येथील घरात घुसुन धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेने चळवळीत व पत्रकारितेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे, साक्री पोलीसात दोघा अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

भारत सरकारने शेतकऱ्यांविरोधात लागू केलेले तीन कायदे व या कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनात कॉ.किशोर ढमाले व कॉ.सुभाष काकुस्ते यांचा सक्रीय सहभाग व त्या विरोधात सुरु असलेल्या विविध आघाड्यांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग असलल्याने आज दुपारी 2.45  वाजता कॉ.सुभाष काकुस्ते चिकुन गुनियाने आजारी असल्याने घरीच वरील मजल्यावर वर्तमानपत्र वाचन करीत बसलेले असतांना दोन अज्ञात इसम मोटर सायकलवर त्यांच्यापांझरा कान कॉलनीतील घरी आले व सरळ वरच्या मजल्यावर चढून कॉ.किशोर ढमाले कुठे आहे. याची विचारणा करु लागले, त्यांना सांगीतले की ते पुण्याला राहतात. मग आम्हाला पुण्याचा पत्ता द्या. व तुम्ही माजले आहेत, आंदोलने, मोर्चे, रास्ता रोको करतात, पंतप्रधान मोदीजींच्या विरोधात बोलतात तुमचा बंदोबस्त करावा लागेल. अशी दमबाजी सुरु केली त्यावेळी कॉ.काकुस्ते कॉटवरुन गॅलरीत येवू लागले असता त्यांना जोरात छातीवर धक्का मारुन कॉटवर पाडले तेथून ते खाली कोसळले. आणि त्याच वेळेस दोघेही अज्ञात खाली उतरुन मोटार सायकलवर बसून पसार झालेत. कॉ.काकुस्ते यांनी गॅलरीत येऊन आरडाओरड केली मात्र दुपारची वेळ असल्याने कॉलनीत सुनसान परिस्थिती होती. त्या दोघा अज्ञातांकडे स्प्लेंडर गाडी होती व नंबर प्लेटवर चिखल माखलेला होता. कॉ.काकुस्ते यांच्या तक्रारीवरून साक्री पोलिस स्टेशन ला भा.द.वी.कलम 323,504,506,34,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तपास सुरु केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फडणवीसांना आमंत्रण नाही…नारायण राणे म्हणाले

वर्ध्यात देवदर्शनाला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार 4 जण जखमी