in ,

आरेत आज पुन्हा बिबट्याचा हल्ला !

आरेत आज पुन्हा युनिट क्रमांक 13 येथे 12 वर्षांच्या मुलावर आज रात्री बिबट्याने हल्ला केला. मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच तेथील रहिवाश्यांनी मुलाला ट्रॉमा सेंटर मध्ये उपचारासाठी नेले.

प्रामुख्याने दाक्षिणात्य नागरिकांची वस्ती असून या वस्ती लगत डोंगराळ भाग आहे. गेल्या दीड महिन्यातील बिबट्याचा हा सातवा हल्ला असून आरेत बिबट्याचे सतत होणारे हल्ले यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन खात्याने येथील बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश धुरी यांनी केली आहे.

येथे जरी एका बिबट्याच्या बछड्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले,तर एका बिबट्याच्या बछड्याला स्थानिकांनी पकडून वनखात्याच्या हवाली केले होते.मात्र अजूनही येथे किमान 6 ते 7 बिबटे आहेत अशी माहिती मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिपी विमानतळावर मुख्यमंत्र्यांसोबत ‘हे’ नेते दाखल

ड्रग्ज प्रकरण : भाजपा नेत्यांच्या आदेशावरून ३ आरोपींना एनसीबीनं सोडलं; नवाब मलिकांचा गंभीर दावा