in

Ahmednagar Leopard Attack ;श्रीरामपूर शहरात भरवस्तीत शिरला बिबट्या, बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जण जखमी

कुणाल जमदाडे : शिर्डी | अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरवस्तीत बिबट्या शिरला आहे. या बिबट्याने चौघांवर व्यक्तीवर हल्ला केला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा LIVE VIDEO समोर आला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, बिबट्या त्या इसमावर झटप घेतो. 

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीत बिबट्या शिरला आहे. भरवस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकही चकीत झाले आणि धावपळ सुरू झाली. याच दरम्यान बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले आहेत. वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्या शहरातील वस्तीत शिरल्याची माहिती तात्काळ पोलीस आणि वन विभागाला देम्यात आली आहे. ही माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वन विभागाकडून या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आफ्रिकेतून धारावीत आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

नाशिकमधील साहित्य संमेलनालाआलेले 2 जण कोरोना बाधित