in

मुंबईत वयस्कर महिलेवर बिबट्याचा हल्ला; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ!

गोरेगाव पूर्व आरे मध्ये युनिट नंबर ३ च्या सरकारी निवासस्थान येथे राहत असलेल्या कुमार आयुष यादव या ४ वर्ष वयाच्या बालकावर बिबट्याने दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. सदर घटना ताजी असताना आज आरे मध्यवर्ती कार्यालय विसावा येथे सुमारे आठच्या सुमारास बिबट्याने पाठीमागून येत एका महिलेवर जोरदार हल्ला केला.

श्रीमती निर्मलादेवी सिंह असे पिडीत महिलेच नाव आहे. महिला घरातून बाहेर काठी टेकत आली आणि येथील कठड्यावर बसली आणि मग लगेच चक्क मागून येत बिबट्याने तीच्यावर हल्ला केला. बिबट्या या महिलेवर हल्ला केला. यावेळी या शूर महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या हातातील काठीने बिबट्यावर प्रति हल्ला करत त्याचा हल्ला परतवून लावला. अंगावर काटा आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा’; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्रांद्वारे मागणी

अटकेच्या भीतीपोटी परमबीर सिंग यांचे देशाबाहेर पलायन?