in

मनुष्यवस्तीत शिरला बिबट्या; सीसीटीव्हीत कैद

अमरावती शहराच्या बायपास रोड परिसरातील महादेव खोरी भागात लोकवस्तीत असलेल्या रवींद्र वैद्य यांच्या घरात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक एक बिबट्या आता शिरल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास परिसरातील श्वान हे भुंकत असल्याने सकाळी फॉर्म हाऊस वरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

अमरावतीच्या महादेव खोरीत राहणारे रवींद्र वैद्य यांचे यांचे यांचं परिसरात एक मोठे फॉर्म हाऊस आहे. या फॉर्महाऊस वर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास बिबट्याने एंट्री केली होती. यावेळी काही वेळ बिबट्या या फॉर्म हाऊस वर फेरफटका मारल्याच्या त्याच्या हालचाली कॅमेरात कैद झाल्या आहे. दरम्यान महादेव खोरीत आता बिबट्या आढळल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोबाईल वाचवताना रिक्षातून पडून महिलेचा मृत्यू

आरामदायी विस्टाडोम कोकण रेल्वे मार्गावरून धावली