in

गुजरात निवडणुकीत अपक्ष उमेदवारांपेक्षा कमी जागा!

Supporters hold party flags during an election campaign rally by India's ruling Congress party president Sonia Gandhi in Mumbai April 26, 2009. REUTERS/Punit Paranjpe (INDIA POLITICS ELECTIONS) - GM1E54Q1QHD01

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वच्या सर्व ३१ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. यांपैकी २९ जिल्हा परिषदा तर अशा होत्या, जेथे काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची संख्या दुहेरी आकडाही गाठू शकली नाही. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे.

गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असून, ३१ जिल्हा परिषदा, ८१ पैकी ७५ नगरपालिका, २३१ पैकी २०० तालुका पंचायतींमध्ये भाजपने निर्विवाद विजय संपादन केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित चावडा आणि विरोधी पक्षनेते परेश धनानी यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. भाजपची विजयी परंपरा कायम राहिली असून, काँग्रेस आमदारांचे अनेक पुत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra budget session | शेतकरी नुकसानभरपाई मुद्द्यावरुन भाजप आक्रमक

संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलाच नाही?