in

LIC पॉलिसीधारकांसाठी मोठी बातमी, आता बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करा

भारतीय जीवन विमा निगमनं (LIC) पॉलिसीधारकांसाठी महत्वाचं अभियान सुरु केलं आहे. त्याअतंर्गत अपरिहार्य कारणामुळं बंद झालेली पॉलिसी नियमित करता येणार आहे. एलआयसीनं पॉलिसी नुतनीकरणासाठी नवीन अभियान सुरु केलेय. हे अभियान 7 जानेवारीला सुरु झालं असून 6 मार्च 2021 पर्यंत सुरु राहणार आहे. या अभियानांतर्गत विमाधारक त्यांची कालावधी पूर्ण करण्यापूर्वी बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करु शकतील. मात्र, एलआयसीनं त्यासाठी काही नियम लागू केले आहेत.

एलआयसीनं कालावधी संपण्यापूर्वी बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी नवीन अभियान सुरु केले आहे. जीवन विमा निगमनं यासाठी विशेष अभियान सुरु केलेय. त्याअतर्गत अपरिहार्य कारणांमुळे हप्ते भरता न आल्यानं ज्यांची पॉलिसी लॅप्स झालीय त्यांना ती पुन्हा नियमित करता येतील. एलआयसीनं यासाठी एक कालमर्यादा निश्चित केली आहे. विमाधारक या योजनेचा फायदा घेऊ शकतात. मात्र, प्रीमियमची तारीख 5 वर्षांपेक्षा जुनी असू नये. पॉलिसी पुन्हा नियमित करण्यासाठी विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. LIC सूचनांनुसार टर्म इंन्शुरन्स, आरोग्य विमा, मल्टीपल रिस्क पॉलिसीज, यासारख्या विमा पॉलिसींवर कोणतीही सूट दिली जाणार नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आधी तुमची मानसिकता बदला… अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

अमरावतीत लॉकडाऊनची घोषणा