in ,

पुलावर गळफास घेऊन संपवले आयुष्य

शहरातील गजबजलेल्या भाट्ये पुलाला गळफास लावून तरुणाने आपले जीवन संपवले. हा प्रकार शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास समोर आला.रत्नागिरीनजीकच्या मिऱ्या येथील गुरुनाथ सखाराम पाटील असे या तरुणाचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

रत्नागिरी शहरातून पावसकडे जाण्याच्या मार्गावर भाट्ये येथे खाडीवर पूल आहे. हा मार्ग नेहमीच गजबजलेला असतो. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास येथे गुरुनाथ पाटील याने गळफास लावून घेतला आणि पुलावरुन उडी मारली. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

भाट्ये खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी तो मृतदेह प्रथम पाहिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयाकडे पाठवला आहे. पुलावरुन खाडीत उडी मारुन आत्महत्या करण्याचे प्रकार याआधी घडले आहेत. मात्र पुलाला गळफास लावून घेण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत पुणे महानगरपालिकेनं घेतला मोठा निर्णय

…तर असा आहे जागतिक टपाल दिनाचा इतिहास आणि महत्त्व!