in

चीनच्या वुहान लॅबमध्ये सापडली जिवंत वटघाटळं; व्हिडीओ झाला व्हायरल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून महाराष्ट्र जरी सावरत असला, तरी चीनमधून मात्र एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. वुहानमधूनच कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जात. चीनवर असे आरोप केले जात असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेत वटवाघळांना जिवंत ठेवले जात असल्याचे समोर आले.

‘चायना अकादमी ऑफ सायन्स’ने मे 2017 मध्ये एक व्हिडाओ प्रसारीत केला होता. वुहान प्रयोगशाळेतील नवीन बायोसेफ्टी लेव्हल 4 वरील सुरक्षा सुरू करण्यात आल्यानंतर हा व्हिडिओ जारी करण्यात आला. यामध्ये प्रयोगशाळेत एखादा अपघात झाल्यास सुरक्षा मानके काय आहेत, याची माहिती देण्यात आली होती.

10 मिनिटांचा व्हिडिओ वुहान प्रयोगशाळेवर आधारीत असून यामध्ये काही शास्त्रज्ञांच्या मुलाखतीदेखील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात वुहानच्या प्रयोगशाळेत वटवाघळे असण्याबाबत काहीही नमूद करण्यात आले नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दोन्ही राजे अखेर एकत्र; मराठा आरक्षणप्रकरणी पुण्यात दोघांमध्ये बैठक

‘इंधन दर कमी करता येणार नाही’-पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान