in

संपूर्ण फोन टॅपिंगचा 6.3GB डेटा माझ्याकडे आहे – देवेंद्र फडणवीस

गृहमंत्री अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी होम क्वारंटाइन नव्हते. ते एका खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्या दिवशी ते अनेकांना भेटले होते, असा दावा करतानाच शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली असून आता देशमुख एक्सपोज झाले आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच केंद्रीय सचिव यांची भेट घेऊन सीबीआय चौकोशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली. फोन टायपींगचा संपूर्ण डेटा 6.3 जीबीचा डेटा आहे. जेव्हा हे लक्षात आलं की यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. मुख्यमंत्र्यांकडून हा रिपोर्ट गृहमंत्र्यांकडे देण्यात आली’, असा आरोप फडणवीसांनी केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पवारांचे दाव्यांची पोलखोल केली होती. त्यामुळे फडणवीस आज काय मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवातीला बोलेल त्यानंतर मराठीत बोलेले. पवारां इतकं माझं इंग्रजी चांगलं नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलतो, अशी सुरुवात करत फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेचा रोख काय असणार आहे हे स्पष्ट केलं.

माननीय पवार साहेबांनी हा विषय राष्ट्रीय बनवल्याने मी पत्रकार परिषद हिंदीत सुरवात करणार आहे. अंबानी यांच्या घराबाहेर गाडी सापडली त्याचा तपास करत असताना अनेक खुलासे बाहेर आले असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित पत्रकार परिषदमध्ये लगावला.

15 तारखेचा गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. 15 तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. 15 तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात 17 फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी 3 वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे 11 वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही, असं फडणवीस म्हणाले.

15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते

काल पवारांना योग्य ब्रिफिंग दिली जात नव्हते. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. देशमुखांना प्रोटेक्ट केलं गेलं. त्यामुळे ते एक्सपोज झाले होते. 15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावाही त्यांनी केला.

LIVE – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

  • NIA आणि ATS तपास करत असताना सचिन वाझे यांना NIA अटक केलं
  • काल शरद पवारांनी पत्राबाबत पत्रकार परिषद घेतली
  • परमबीर यांचे दावे खोटे आहेत असं सांगतले आहे
  • 15 तारखेपासून गृहमंत्री जरी घरात असले तरी
  • पोलीस हालचालींचे काही कागद माझ्या हाती आहेत
  • 17 फेब्रवारी 3 वाजता गृहमंत्री सह्याद्री वर जाणार होते असे कागद पत्रात लिहल आहे आले की नाही माहीत नाही
  • सीबीआयमार्फत तपास करावा
  • फोन टायपींगचा ६.३ जीबीचा डेटा माझ्याकडे आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजप महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि गुजरातसाठी दुसरा न्याय का?

राज्यातील राजकीय वास्तव सांगताना भाजपाच्या अतुल भातखळकरांनी शेअर केले कार्टून