in

मोठी बातमी : 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु होणार – मुख्यमंत्री

लोकशाही न्यूज नेटवर्क

जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. मात्र आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र आता 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशी वेळ ठरवून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

लोकलमधून आता सर्वाना प्रवास करता येणार असून त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.


कधी प्रवास करता येईल:

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

कधी प्रवास करता येणार नाही:

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. मात्र परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील. मात्र अद्याप रेल्वे बोर्डाची मंजुरी नाही. आता रेल्वे बोर्डाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown Extended | राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम

टाटावाले बाबा यांची राम मंदिराला एक कोटीची देणगी