in

अमरावतीत कोरोना विस्फोट; सोमवारी सकाळपर्यंत ‘लॉकडाऊन’

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात रात्री 8 वाजल्यापासून 36 तासांचा म्हणजे सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

रात्रीपासून मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व दुकाने बंद आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा अमरावती शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरावतीमधील नेहमी गजबजलेल्या चौकांपैकी राजकमल चौक, इर्विन चौक, पंचवटी चौक, जयस्तंभ चौकात आज स्मशान शांतता दिसून आली.

तसंच याठिकाणी व इतर अमरावतीच्या परिसरात नागरिक घराबाहेर आले नव्हते तर सर्व दुकाने कडकडीत बंद होती. त्यामुळे सकाळी अमरावतीकरांनी या लॉकडाऊनला उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे. रस्त्यावर फक्त पोलीसच दिसून आले, तर अमरावतीचे रस्ते आज पुन्हा निर्मनुष्य झाले होते. अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डोंबिवलीमध्ये कामगार वसाहतीला भीषण आग

‘माझा फोन टॅप होत असल्याचा संशय’; आव्हाडांच्या टि्वटनं खळबळ