in

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनच्या उंबरठयावर? प्रशासकीय नियोजनाचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यायातच टास्क फोरने येत्या काही दिवसात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ शकते असा अंदाज लावला आहे. याचं पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाउनसंदर्भात प्रशासकीय यंत्रणांना तयार राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत.

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे औरंगाबाद नांदेड, नागपूर , बीड, अमरावती या शहरामध्ये मिनीकोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉकडाउन केले आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे, असं देखील टोपे यावेळी म्हणाले. ICMR च्या नियमाप्रमाणे किमान १५ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असतो. तरच कोरोनाची साखळी तुटेल. कोरोना रुग्ण बरा होण्याला १५ दिवस लागतात, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे.

बैठकीतील निर्णय

• मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.
• ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा.
• गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा.
• मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे.
• प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी.
• विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत.
• सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गडचिरोली जिल्ह्यात आष्टी-आलापल्ली मार्गावर भीषण अपघात , ४ ठार तर १० जखमी

संतापाचा उद्रेक ! शेतकऱ्यांनी केला भाजपा आमदारावर हल्ला