in

लोकशाही इम्पॅक्ट | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झेडपी अध्यक्षाच उपोषणाचे वृत्त प्रकाशित होताच आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल

प्रतिनिधी- भूपेश बारंगे

वर्धा जिल्ह्यातील तीन केंद्रावर पॅड भरती न केल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरीता गाखरे उपोषण केले होते त्यानंतर लोकशाही वेब प्रकाशित केल्यानंतर रात्री उशिरा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 118 आरोग्य संस्थांकरिता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा ,226अकुशल मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यास निर्माण करण्यास व आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे असे आदेश काढण्यात आले.

आजही ग्रामीण भागात आरोग्य सुविधांच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधींना आंदोलन करत करावी लागत आहे. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कोरा तर कारंजा तालुक्यातील नारा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार करण्यात आली आहे. पण पदभरती न झाल्यान हे केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पद भरतीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांनी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांनी लाक्षणिक उपोषण केल. उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती सरस्वती मडावी यांचा उपोषणात सहभागी झाल्या होत्या. आकृतिबंधानुसार पद भरतीला शासन स्तरावरून मंजूरी मिळण्याची मागणी करण्यात आली. या ठिकाणी दोन वर्षांपासून इमारत तयार करण्यात आली आहे. पण पदभरती झाली नसल्याने दोन्ही आरोग्य केंद्र अद्याप सुरू झालेले नव्हते. अध्यक्षांकडून पदभरतीकरिता दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. लाक्षणिक उपोषण सुरू केल्यानंतर खासदार रामदास तडस यांची भेट दिली. त्यानंतर रात्री शा.निर्णय क्र.पदनि 2020/प्रक44/आरोग्य 3 दि.7/6/2021 अन्वये जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्र नारा,कोरा, वायगाव व उपकेंद्र खापरी येथील पदभरतीस शासन स्तरावरुन मान्यता प्रदान करण्यात आली आहे. उपोषणाची दखल घेवून तातडीने पदभरती आदेश निर्गमित केले. राज्यातील शासन निर्णयान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यात मान्यता देण्यात आली आहे. सदर आरोग्य संस्थेने 75 टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे. तसेच अनुक्रमांक 12 व 15 येथील शासन निर्णयान्वये उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर युनिय इत्यादी आरोग्य संस्थाकरीत आवश्यक असणाऱ्या पदाचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण जनतेकरिता रुग्णसेवा पुरवण्यासाठी या रुग्णालयाचया ठिकाणी आकृतिबंधनुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकऱ्यांनी कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या असतील , तर ‘या’ वर मिळणार २०% सूट

कोरोनाच्या बनावट गोळ्या बनवून विकणाऱ्या आरोपीस अटक