in

पंचवीस वर्ष प्रेताची राख सावरून उदरनिर्वाह; निर्मला भीमोरे या अष्टभुजा देवीला लोकशाहीचा सलाम

सूरेश काटे, कल्याण – डोंबिवली | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमीमध्ये अष्टभुजा देवीच्या रूपात प्रेताची राख सावरून संसाराचा गाडा हाकणाऱ्या निर्मला भिमोरे यांना लोकशाहीचा सलाम…

गेली २५ वर्षापासून कल्याण मधील लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमीत राख सावरून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. आतापर्यत या अष्टभुजा असलेल्या निर्मलाने हजारो प्रेतांची राख सावरली आहे. पतीच्या आजारपणानंतर प्रेताची राख सावरण्याचे काम निर्मलाने हाती घेतले आणि ते आजवर सुरूच ठेवले आहे. प्रेताच्या नातेवाईकांनी दिलेल्या पैशांवर त्यांच्या उदरनिर्वाह होतो. हिंदू धर्मामध्ये मरणानंतरची सेवा ही पुण्याची मानली जाते हीच सेवा निर्मला करत असल्याने त्यांचे कौतुकही केले जाते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SAFF Championship: सुनील छेत्रीने केली महान फुटबॉलपटून पेलेची बरोबरी

अमरावती जिल्ह्यात पिकावर शंखअळीचा प्रादुर्भाव