in

पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

बनावट ग्राहक पाठवून रचला सापळा

सुशांत डुंबरे
लोणावळा परिसरात सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधून दोन मुलीची सुटका करण्यात आली असून एका दलालास पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण आणि लोणावळा ग्रामीण पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली आहे. धनंजय कातवारू राजभर असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. धनंजय हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे रॅकेट चालवण्याचे काम करतो, पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. तसेच यामध्ये अजुन कोण सहभागी आहे, याचा शोध सुरु असून लवकरच सर्वजण गजाआड होण्याचा दावा पोलिसांनी केलाय.

व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून, दर ठरवून त्या मुलींना मोटारीतून लोणावळा परिसरातील ग्राहकांना पुरवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे धनंजय यांच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधला. त्याने व्हॉट्सअप वर वेश्याव्यवसायासाठी मुलींचे फोटो पाठवून दर ठरवल्यानंतर या मुलींना तो लोणावळा येथे घेऊन येतो, असे सांगितल्यानंतर पोलीसांनी सदर जागी सापळा रचला. त्यानंतर आरोपी हा मोटारीतून दोन मुली घेऊन तेथे आला. खात्री पटताच पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. दोन्ही मुली दिल्ली येथून वेश्या व्यवसायासाठी आणल्या होत्या. या मुलीची सुटका केली असून लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुबोध जयस्वाल यांना नोटीस; 14 ऑक्टोबरला हजर राहण्याचे निर्देश

पुष्पक एक्सप्रेस प्रकरणात तीसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या