in

एलपीजी सिलिंडर महागला ; आजपासून मोजावे लागणार ‘एवढे’ पैसे

जागतिक बाजारात इंधन दरात झालेल्या प्रचंड वाढीचा फटका बसलेल्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. वाणिज्य वापरातील १९ किलोच्या एलपीजीच्या किमतीत १०० रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीने सलग दुसऱ्या महिन्यात छोट्या व्यावसायिकांना दणका दिला आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नाही.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला. गेल्याच महिन्यात वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत तब्बल २६६ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज आणखी १०० रुपयांनी सिलिंडर महागला आहे.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचा भाव २०५१ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत १९ किलोचा सिलिंडर आजपासून २१०१ रुपये झाला आहे. तर चेन्नईत २२३४ असा विक्रमी दर १९ किलो सिलिंडरसाठी झाला आहे. कोलकात्यात १९ किलो सिलींडरसाठी २१७७ रुपये दर असेल.

What do you think?

-27 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जागतिक एड्स दिन २०२१ | AIDS आणि HIV फरक काय? बचाव कसा कराल?

कोरेगाव भीमा प्रकरणातील नऊ पैकी एका आरोपीला जामीन मंजूर