in

पुन्हा आर्थिक झळ… घरगुती गॅसची किंमत वाढली!

पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती सिलेंडच्या किंमतीत वाढ केल्याने सर्वसामान्यांना आणखी आर्थिक झळ बसणार आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीतील घरगुती सिलिंडरच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा दर 859.5 रुपये झाला आहे. ही दरवाढ सोमवारी रात्रीपासूनच लागू होणार आहे.

कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरचा दर 886 रुपये, मुंबईमध्ये 859.5 रुपये, लखनऊ 897.5 रुपये एवढे दर झाले आहेत. याचबरोबर 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर 68 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर 1618 रुपये झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साताऱ्यातील पर्यटनस्थळे पुन्हा सुरू;सातारा जिल्हा प्रशासन