in

चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे

बॉलीवूड कलाकारांवर प्राप्तिकर विभागाचे छापे सत्र सुरूच आहे. नुकतेच चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना याच्या मुंबईतील ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीवर कर चुकवेगिरी प्रकरणांमध्ये प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे.

मधू वर्मा मंटेना यांनी हिंदी, तेलुगू व बंगाली भाषांमध्ये अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे. मधू वर्मा मंटेना यांनी 2008 मध्ये गजनी चित्रपटाची सुद्धा निर्मिती केली होती. मधू वर्मा हे बॉलिवूडमधील दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे चुलत भाऊ आहेत.

मंटेगा यांनी ‘फँटम’ चित्रपटाच्या माध्यमातून सहनिर्माता म्हणून सुरूवात केली होती. त्याच प्रमाणे ‘लुटेरा’, ‘हसी तो फसी’, ‘अगली’, ‘एनएच 10’, ‘हंटर’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘शानदार’, ‘मसान’, ‘उडता पंजाब’, ‘रमण राघव 2’, ‘रॉंग साईड राजू’, ‘मुक्काबाज’, ‘हायजॅक’, ‘मन मर्जीया’ व ‘सुपर 30’ या चित्रपटांची निर्मितीदेखी त्यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

व्हायरल पोस्टची झाली चर्चा, फडणवीसांनी मानले आभार अन् अजितदादांकडून कारवाईचे आश्वासन

Taj Mahal | ताजमहालमध्ये बॉम्बची अफवा; तरुण पोलिसांच्या ताब्यात