in

धकधक गर्ल माधुरीने घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दिक्षीतने कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तिने या संदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमधून त्यांनी पात्र असलेल्या सर्वांना लस घेण्याचं आवाहनही केलं आहे.

देशात लसीकरणाची मोहीम सुरु झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी लस घेतली आहे. आता अभिनेत्री माधुरी दिक्षीतने कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. या आधी मलायका अरोरा, सैफ अली खान, सतिश शाह, अनिल कपूर यांचाही या यादीत समावेश आहे.

दरम्यान देशात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे.त्यामुळे पात्र असलेल्या सर्वांना लस घेण्याचं आवाहन माधुरीने केले केलं आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona:दिलासादायक! बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ

कलाकार पुंडलिक पालवे यांचे कोरोनाने निधन