‘साला एक मच्छर आदमी को…हा नाना पाटेकरांचा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. आता मच्छर चावणं कोणाला इतकं महागात पडू शकतं की त्याची नोकरीसुद्धा जाऊ शकते, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सीधी येथील अतिथिगृहात मुक्काम होता. यावेळी त्यांना रात्रभर डास चावले. तेथील अस्वच्छतेमुळेही मुख्यमंत्री चांगलेच संतापले.
मुख्यमंत्री सिधी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते सर्किट हाऊसमध्ये विश्रांतीसाठी थांबले. याची पूर्वसूचना सर्किट हाऊसचे प्रभारी बाबूलाल गुप्ता यांना देण्यात आली होती. तरीही परिसरात स्वच्छता नव्हती. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुप्ता यांना निलंबित करण्यात आलं, अशी माहिती आहे. रिवा विभागाच्या आयुक्तांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
सीधी जिल्ह्यात बसला भीषण अपघात झाला होता. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी चौहान सीधी दौऱ्यावर होते. या दुर्घटनेत ५१ जणांचा मृत्यू झाला. बस थेट कालव्यात कोसळल्यानं हा अपघाता झाला होता. अपघातासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन चौहान यांनी यावेळी दिलं.
Comments
Loading…