in

Madhya Pradesh | 54 प्रवाशांनी भरलेली बस खोल कालव्यात कोसळली

लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्‍य प्रदेशमध्ये एका बसचा भीषण अपघात झाला आहे. तब्बल 54 प्रवाशांनी भरलेली बस खोल कालव्यात पडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 7 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं असून ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप 47 बेपत्ता आहेत. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

ही बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. बस कालव्यात पडल्यानंतर बुडायला लागली. तेव्हा सात प्रवाशांनी बसच्या बाहेर पडण्यात यश मिळवले. हे प्रवासी पोहत कालव्याच्या बाहेर पडले. मात्र, उर्वरित 47 प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. यापैकी चौघांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळत आहे. तर उर्वरित लोकांचा सध्या शोध घेतला जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

टूलकिट प्रकरण : अटकपूर्व जामिनासाठी निकिता जेकब आणि शंतनू न्यायालयात

‘माँ कँटीन’ देणार पाच रूपयांत जेवण