in

Maghi Ganeshotsav | आता तयार झालेल्या गणेशमूर्तींचे करायचे काय?

लोकशाही न्यूज नेटवर्क

माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणंच माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करा, असा निर्देश राज्य सरकारने मंडळांना दिले आहेत. त्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी गणेशोत्सवासाठी नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

“माघी गणेशोत्सवासाला केवळ पाच दिवस बाकी असताना नऊ फेब्रुवारीला राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यात गणेशमूर्तीची उंची चार फूट आणि मंडपांच्या आकारावर ही निर्बंध घातले. ठाकरे सरकारला गणपती उत्सवाच्या तयारीला किती वेळ लागतो हे माहित नाही का?” असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का? नियम आधीच का जाहीर केले नाहीत? आता तयार झालेल्या मुर्त्यांचे काय करायचे? असे प्रश्न आशिष शेलार यांनी विचारले आहेत. कोणीही न मागता बार, पबना रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मोकळीक देणार आणि हिंदुंच्या गणेशोत्सवात मात्र विघ्न घालणार! सरकार नशा बहाद्दरांचे आहे की,उत्सव प्रेमींचे? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

सरकारने काय म्हटलं आहे
भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. माघी गणेशोत्सव १५ फेब्रुवारी रोजी होत असून करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा. अद्याप करोनाचे सावट पूर्णत: निवळले नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्या सरकारने स्पष्ट केले आहे.

राज्यसरकारकडून मंडळांसाठी कोणते नियम?

  • मंडप उभारणीसाठी पालिकेची अथवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
  • मंडप मर्यादित आकाराचा असावा, आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही, सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी, शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
  • मंडपात एका वेळी १० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि १५ पेक्षा अधिक भाविक नसावे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रसिद्ध क्रिकेटपटू वासिम जाफरवर गंभीर आरोप

अंधेरीत मेट्रोच्या कामकाज दरम्यान आग