in

महाबळेश्वर अत्याचारित पीडितेवर दबाव; चित्रा वाघ

प्रशांत जगताप, सातारा | महाबळेश्वर येथील अल्पवयीन युवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पीडितेवर दबाव निर्माण होण्याची शक्यता भाजपच्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्यात बलात्काराच्या घटना घडत असताना, राज्याचे दोन्ही गृहराज्यमंत्री आहेत कुठं ? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महाबळेश्वर येथील अल्पवयीन युवतीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी पिडित मुलीची भेट घेतली. महाबळेश्वरमध्ये एका अल्पवयीन युवतीवर दोन जणांनी अत्याचार केला असून यामध्ये शिवसेना नेत्यांच्या दोन मुलांसह एकूण 13 जण सहआरोपी आहेत.यावर अल्पवयीन पिडित मुलीवर राजकीय दबाव निर्माण होण्याची शक्यताही वाघ यांनी व्यक्त केली आहे. तसेच चित्रा वाघ यांनी, राज्यात कोणतंही असं ठिकाण नाही जिथं महिलांच्यावरती अत्याचार झाला नाही, असे विधान केले आहे.

या गंभीर घटनेमध्ये कोणीही तक्रार केली नसून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.शीतल खराडे यांनी सुमोटो तक्रार दाखल केल्याने चित्रा वाघ यांनी त्यांची प्रशंसा करत राज्यातील इतर पोलिसांनी ही त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन पोलीस दलाला केले. तसेच सत्ताधारांच्या दावणीला पोलीस बांधले गेले असून पोलीस अधिकारी डॉ.शीतल खराडे यांच्याकडे या घटनेचा तपास जोपर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडेच राहावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली .

संजय राठोड प्रकरणातील पोलीस हे पोलीस दलाला काळीमा असून महिला अॅट्रॉसटीवरती कधीही न तोंड उघडणारे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती सडकून टीका करत राज्यात महिला अत्याचाराचा हाहाकार होत असताना हे राज्याचे दोन्ही गृहराज्यमंत्री कुठे आहेत असा सवाल उपस्थित केला. तसेच साताऱ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा असून ते महाबळेश्वरला जातील अशी आम्हाला आशा असून ते गेल्यास आम्हाला आनंद होईल असे वक्तव्य वाघ यांनी केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक फिरोझ खान

हिंगोलीत धबधबा पाहण्यासाठी गेलेले 3 तरुण बेपत्ता