in ,

राज्यात पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक आयोजित करण्यात आले. यात ओमिक्रॉन व्हेरियंटवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक मंत्रालयात होणार असून, या बैठकीला मुख्यमंत्री व्हीसीद्वारे सहभागी होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा ओमिक्रॉन विषाणू जगभरात पाय पसरत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रासाठी नियोजन करण्याबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. ‘ओमिक्रॉन’ नव्या व्हेरियंटने डोकं वर काढलाय त्यामुळे शाळा सुरु कराव्यात का नाही यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

देशाबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबतची नियमावलीही आज जाहीर होण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी सर्व विभागांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना काही सूचनाही केल्या आहेत. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशी सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना आणि स्थानिक प्रशासनाला केली आहे.

मुंबई महापालिकेने शाळा सुरू करण्यासाठी सावध भूमिका

मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागामार्फत आज, 29 नोव्हेंबरला महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासमोर सादर होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळांविषयी जो निर्णय होईल त्यानुसार आयुक्तांकडून मुंबईतील शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई महापालिकेने शाळा सुरू करण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे. शिक्षण विभागाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांतही सर्व शाळा सुरू होणार असल्याने आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व शाळा, जिल्हे, महापालिका,महापालिका, नगरपालिका, छावणी बोर्ड यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळांसंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शाळा सुरु होणार का? सध्या तरी ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका

राज्यातील शाळा या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने या आधी घेतला होता. आता ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करणे योग्य ठरेल का यावर चर्चा करण्यात आली आहे. . शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्सशी चर्चा करुण निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय. त्यामुळे सध्यातरी ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमीका घ्यावी असं या बैठकीत ठरल्याचं समजतंय.

तिसऱ्या लाटेची तयारी?

राज्यात कदाचित तिसरी लाट आली तर त्याचा आढावा घेण्यासाठी बेड, मेडिसिन, ऑक्सिजनची तयारी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी केल्या आहेत.

केंद्राच्या राज्यांना सूचना
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठीच्या सूचना केल्या आहेत. राज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवणे, त्यांनी मागील कालावधीत केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती, तपशील घेण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

भिवंडीत मॅरेज हॉलला भीषण आग; अनेक वाहनांचा कोळसा