in

Maharashtra assembly budget session | अधिवेशन सुरू होताच काही तासांतच भाजपाचे सभात्याग

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वादळी ठरला आहे. भाजपने आक्रमकपणे बाजू मांडत ठाकरे सरकारवर हल्लाबोल सुरू केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अखेर या शाब्दिक वादात भाजपने सभागृह त्याग करण्याचा निर्णय घेतला.

‘महाविकास आघाडीचा खरा चेहरा आज पाहायला मिळाला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये आम्हाला माहिती घेण्याचा अधिकार होता. विदर्भ व मराठवाड्यासाठी निधी देण्याबाबत वैधनानिक विकास महामंडळाच जे कवच असतं ते कवच आता राहिलेलं नाही. विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष महाविकास आघाडी भरून काढणार नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

तसंच, ‘आमची अपेक्षा होती आणि नाना पटोले यांना मी विनंती केली की, तुम्ही विदर्भातील आहात आपल्याला निधी मिळत नाही. तसंच मी अशोक चव्हाण यांना मराठवाड्याचे म्हणून विनंती केली. मात्र त्यांना खुर्चीसाठी सर्व काही सोडल आहे’ अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Motorola चा Moto E7 Power स्मार्टफोन लॉन्च

कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण