in

Maharashtra budget session 2021 LIVE | मुंबईला 4 वर्ष उशिराने मेट्रो मिळणार – मेट्रोवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोनाकाळात मुख्यमंत्री फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. यातील एका फेसबुक लाइव्हचा संदर्भ घेत, तुमचा आवाज जनतेपर्यंत पोहचतोय पण महाराष्ट्राच्या जनतेच्या आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या ‘मी जबाबदार’ मोहिमेवर टीकास्त्र सोडले. ‘मी जबाबदार’ म्हणणारे राज्य सरकार कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. अमरावतीमध्ये लॉकडाऊन का केले ? आणि तो कशाच्या आधाराने केला ? असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारले .

देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील काही मुद्दे

  • कोरोना काळात भरपूर भ्रष्टाचार झाला
  • कोरोना काळात कंत्राट कोणाला दिले , त्यांची नावे जाहीर करावी
  • मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार
  • राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट असताना सरकार पाठ का थोपटून घेत आहे ?
  • आरोग्य खात्याच्या भरतीची फक्त जाहीरात केली, पण वास्तवात भारती केली नाही.
  • सरकारमध्ये फक्त फेसबुक लाइव्ह होतंय.
  • वैधानिक विकास मंडळ व्हायलाच हवी
  • कारशेड कांजुरमार्गला नेण्यावरून सरकारला सवाल
  • कांजूर कारशेडसाठी किमान 500 झाडं तोडावी लागणार.
  • मुंबईला 4 वर्ष उशिराने मेट्रो मिळणार मुंबई मेट्रोवरून

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मौन साधून शेतकऱ्यांविरोधात मोठं पाऊल उचलण्याची केंद्राची तयारी’

पाहा सोन्या-चांदीचे आजचे भाव