in

Maharashtra budget session | फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीची चौकशी होणार!

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. आता ‘फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात येणार’, अशी घोषणा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार दणका दिला आहे.

‘फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्षारोपण करण्यात आले होते. राज्यात वर्ष 2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्टोबर 2020 अखेरीस त्यातील 75.63% रोपे म्हणजे २१ कोटी जिवंत आहेत,त्याची देखभाल करण्यात येत आहे. 2017 ते 2019 कालावधीत वन विभागाने शासकीय यंत्रणा ,शैक्षणिक संस्था,उद्योगसमूह ,खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबाबण्यात आली होती.

ही मोहिम राबवण्यासाठी २०१६-१७ते २०१९-२० दरम्यान २४२९.७८ कोटी निधी मिळाला होता तो पूर्व वापरण्यात आला. २५ टक्के रोपं जिवंत का राहिली नाही याची चौकशी केली जाईल, अशी मागणी मंत्री दत्ताराय भारणे यांनी केली. त्यानंतर या प्रकरणाची विधिमंडळाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संतापजनक | पोलिसांनी मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले

Maharashtra budget session | राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल; सुधीर मुनगंटीवारांची मागणी