in

Maharashtra budget session | जळगाव प्रकरणात तथ्य नाही- अनिल देशमुख

राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोव्हिड सेंटरसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव येथील घटनेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

अनिल देशमुख म्हणाले, “जळगावमध्ये मुलींना वसतीगृहात कपडे काढून पोलीसांनी नाचायला लावले असे काही आरोप झाले. काही व्हिडीओ व्हायरल झाले. यासंदर्भात सहा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांची कमिटी तयार करण्यात आली होती.”

देशमुख यांनी पुढे सांगितले, “41 जणांची साक्ष झाली. त्या घटनेत कोणतंही तथ्य नाही. 20 फेब्रुवारीला एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तेव्हा गरब्याला घालतात तसा झगा महिलेने घातला होता. तिला त्याचा त्रास होत होता म्हणून तिने काढून ठेवला. ज्या महिलेने तक्रार केली तिचं मानसिक संतुलन बिघडले असल्याची तक्रार त्या महिलेच्या नवर्‍याने अनेकदा केली आहे. त्यामुळे त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

WhatsApp Web साठी नवीन फिचर लाँच

Maharashtra budget session | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांविरोधात हक्कभंग प्रस्ताव