in

Maharashtra Corona : 11 हजार 766 नवे कोरोनाबाधित; रिकव्हरी रेट 95.4 टक्के

Computer image of a coronavirus

राज्य अनलॉकची झाल्यानंतर गुरुवारपासून रुग्णवाढ ही 10 हजाराच्या पलीकडेच जात आहे. आज सुद्धा 11 हजार 766 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मात्र बऱ्या होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याने काहीसा दिलासा आहे.

राज्यात शुक्रवारी 11 हजार 766 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 58 लाख 87 हजार 853 झाली आहे. आज दिवसभरात राज्यात 8 हजार 104 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत राज्यात 56 लाख 16 हजार 857 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचा रिकव्हरी रेट 95.4 टक्के नोंदवण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 406 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण २५०च्याही खाली गेले असताना आज त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 6 हजार 367 झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

HSC Exams : यंदा बारावीचे सगळेच विद्यार्थी पास!

मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची बॅटिंग; रस्ते जलमय