in

राज्यात २ हजार ३८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत असल्याचं दिसत आहे. मात्र गुरुवारी कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक आहे.राज्यात आज २,३४३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१३,४१८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३८% एवढे झाले आहे. आज राज्यात २,३८४ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे.राज्यात ३५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.सध्या राज्यात २,२६,२४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण २९,५६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PM Care Fund | ‘केंद्र सरकार स्कॅम ऑपरेट करतेय’; अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांची ‘लोकशाही’ला माहिती

दि पीपल्स फाउंडेशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन