in

राज्यात दिवसभरात 2 हजार 879 रूग्ण कोरोनामुक्त

राज्यातील कोरोना संर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहे. दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत कमी आढळून येत आहे.कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट झालेली आहे. मुंबई, पुणे या सारख्या शहरात तर आता दिवसभरात कोरोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची देखील नोंद झालेली आहे.

आज दिवसभरात राज्यात २ हजार ८७९ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार ८२५ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर, २१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ६४,२७,४२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४३ टक्के एवढे झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन संघातून बाहेर पडणार

मोठी बातमी : शाहरुखने आर्थर रोड तुरुगांत जाऊन घेतली आर्यनची भेट