in

Maharashtra Corona Update | राज्यात रिकव्हरी रेट वाढला, रुग्णसंख्येतही घट

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ओसरल्याचे चित्र आहे. तसेच आज रिकव्हरी रेट देखील ९३.५५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात रविवारी २२ हजार ५३२ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३.५५ टक्के झालं आहे. तर मागच्या २४ तासात १८ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

त्यामुळे सध्या राज्यात एकूण २ लाख ७१ हजार ८०१ सक्रीय रुग्ण आहेत. करोनामुळे राज्यात एका दिवसात ४०२ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.६५ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या ३ कोटी ४८ लाख ६१ हजार ६०८ नमुन्यांपैकी ५७ लाख ३१ हजार ८१५ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यातील करोना पॉझिटिव्हीटी दर १६.४४ टक्के इतका आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जून महिन्यात कोविशिल्डचे १० कोटी डोस… सिरमचं केंद्राला पत्र

”कोरोनाची साथ सरकारी कार्यक्रम नव्हे”; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला