in

Maharashtra Corona Update | राज्यात 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 021 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 44 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे.

राज्यात आज 70 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 10, 875 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 40 हजार 712 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,72,098 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,704 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत आज 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 363 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,15,757 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. कोरोना डबलिंग रेट 1177 दिवसांवर गेला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खून का बदला खून से ! जामिनावर बाहेर येताच आरोपीवर चॉपरने हल्ला

‘तोंडास फेस, कोणाच्या? अग्रलेखावर, चंद्रकांत पाटलांचे संजय राउतांना प्रत्युत्तर