in

महाराष्ट्र कोरोना अपडेट : आकडा चिंता वाढवणारा

लोकशाही न्यूज नेटवर्क

ज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र मागील चार दिवसांपासून हा आकडा पुन्हा चार हजारांच्या वर गेल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. आज दिवसभरात राज्यात चार हजार ९२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, ४० जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात एकूण १९ लाख ७५ हजार ६०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत लोकल सेवा सुरू झाली. यानंतर काही दिवसांतच कोरोना बाधितांच्या संख्येतही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर हा आकडा आणखी वाढला असून मास्क घालण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. सध्या राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर २.५ टक्के आहे.

राज्यात आड एक हजार ३५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत एकूण १९ लाख ७५ हजार ६०३ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७ आहे. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार २४३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर एक हजार ७४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिंडोशी उत्सव प्रकरण: गृहमंत्रालयाच्या आदेशाची पायमल्ली

रेल्वे तिकिट रद्द करताच तात्काळ परत मिळणार पैसे