in ,

Maharashtra Corona | राज्यात मृत्यूदरात वाढ; 197 मृतांची नोंद!

राज्यात एकीकडे कोरोनाच्या नव्या Delta Plus Variant ने शिरकाव केला त्यात दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. या उलट रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. राज्यात नवीन रुग्णांसह मृतांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या 1 लाख 21 हजार 767 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज 9 हजार 844 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा आता 60 लाख 7 हजार 431इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत 9 हजार 371 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा राज्यातला आकडा 57 लाख 62 हजार 661 इतका झाला आहे. त्यापाठोपाठ राज्याचा रिकव्हरी रेट देखील 95.93 टक्के इतका झाला आहे.

राज्यात आज 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी हा आकडा 163 होता. तसेच मृतांचा एकूण आकडा 1 लाख 19 हजार 859 इतका झाला असून राज्याचा मृत्यूदर 2 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून 1.95 वरून 2 टक्क्यांवर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ही प्रशासनासाठी चिंतेची बाब कायम राहिली आहे.

मुंबईत 789 नवे बाधित

मुंबई महानगर पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरात आज दिवसभरात 789 नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे शहरातल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 24 हजार 113 झाला आहे. मात्र, त्याचवेळी मुबईत आज दिवसभरात 542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येतील डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 6 लाख 91 हजार 670 इतका आहे.आज दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 15 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Update | रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने 540 कोरोना बाधित

बांधकाम व्यावसाईक श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांना अटक