in ,

सरकारने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी – प्रशांत दामले

सूरेश काटे, कल्याण-डोंबिवली | नाट्यक्षेत्राला पूर्वीप्रमाणे उभे करायचे असल्यास राज्य शासनाने विविध सोयी सुविधा वाढवून देण्यासह 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी अशी अपेक्षा वजा मागणी सुप्रसिद्ध नाट्यकर्मी आणि कलाकार प्रशांत दामले यांनी केली आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाचा प्रयोगावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दामले यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

कोरोनामुळे बंद झालेली राज्यातील नाट्यगृह आज तब्बल 6 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा सुरू होत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दामले यांनी कोरोनामुळे नाट्यक्षेत्राचे जे नुकसान झाले त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. मात्र नाट्यकर्मींनी शासनाकडे आर्थिक मदतीची कधीच मागणी केली नाही. त्याऐवजी राज्य शासनाने आम्हाला टप्प्याटप्प्याने सोयी – सुविधा वाढवून द्याव्या, तसेच 2022 पर्यंत राज्य शासनाने नाट्यगृहांच्या भाड्यात सूट देण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाट्यक्षेत्रासाठी शासनाने या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास डिसेंबर 2023 पर्यंत नाट्यक्षेत्र पूर्वी जसे होते तसे उभे राहिल असा विश्वासही प्रशांत दामले यांनी यावेळी व्यक्त केला.

तर नाट्यक्षेत्र बंद असल्याने अनेक नवनवीन नाट्य कलाकार, दिग्दर्शक, लेखक हे सध्या मोठ्या प्रमाणात सिरियलकडे वळले असल्याची चिंता दामले यांनी यावेळी व्यक्त केली. नाट्यक्षेत्राला सध्या एका मोठ्या संक्रमणाला सामोरे जावे लागत असून राज्य सरकारने सुविधा द्याव्यात. या सुविधा कागदावर असल्याने नाट्यक्षेत्र पूर्वीप्रमाणे उभे राहण्यास त्यांचा नक्कीच फायदा होईल असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीत शेकडो दलित अद्यापही गावाबाहेरच; गृहमंत्र्यांच्या कारवाईच्या आदेशानंतरही तोडगा नाही

राज ठाकरेंसह आई आणि बहिणीला कोरोनाची लागण, डॉ. जलील पारकर म्हणाले…