in

25 तारखेच्या आत सगळी कॉलेजेस सुरू झाली पाहिजेत – उदय सामंत

कोरोनामुळे गेली अनेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये अखेर आजपासून सुरु झाली आहे.

याच अनुषंगाने राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहनही सामंत यांनी केले आहे. यावेळी बोलताना सामंत म्हणाले, अनेक महाविद्यालयांना नियोजन करायला वेळ मिळाला नसला तरी टप्प्याटप्प्याने त्यांनी नियोजन करावं

तसेच आदित्य ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे कॅम्पस मध्ये जर पहिला आणि दुसरा डोस करता येईल याबाबत मोठी मोहीम पुढच्या आठवड्यापासून आम्ही सुरू करत आहोत.जी नियमावली विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठांना देण्यात आलेली आहे त्याचे तंतोतंत पालन करावे. विद्यार्थ्यांची काळजी आणि त्यांच्या पालकांची काळजी हाच शासनासाठी प्राधान्यक्रम असणार आहे

ज्यांना 20 तारखेला महाविद्यालय सुरू करता आली नाही त्यांनी 21-22 तारखेला करावेत. तसेच 25 तारखेच्या आत सगळी महाविद्यालये कॉलेजेस सुरू झाली पाहिजेत असे देखील सामंत म्हणाले.

काही त्रुटी असतील किंवा शासनाकडून मदत हवी असेल तर ती आम्ही करायला तयार आहोत. दरम्यान तब्बल पावणे दोन वर्षानंतर कॉलेजेस सुरू होत आहेत, त्यामुळे शरद पवारांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे.शाळा – कॉलेज सुरु झाली असली तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामना; ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय!

केंद्र सरकार ठरवून राज्यातील मंत्र्यांना टार्गेट करतेय – विजय वडेट्टीवार