in

Maharashtra Lockdown: राज्यात संपूर्ण लॉकडाऊन; नवीन नियमावली जाहीर

राज्यात ब्रेक द चेनच्या माध्यमातून संपूर्ण लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी ही नियमावली प्रसिद्ध केली आहे.

राज्यात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील.

नियमावली काय ?

  • रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना
  • सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार
  • सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद
  • लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी, नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये
  • खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड.

What do you think?

-6 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Nashik Oxygen Leak : “वैद्यकीय यंत्रणेचं आव्हान वाढवणारी घटना”

राणेंवर केलेली कुरघोडी सेनेच्याच अंगलट; जानवली ग्रामपंचायतीची सत्ता भाजपकडे